Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

शासकीय रेशनिंग तांदळाच्या गोण्यांची आदलाबदली करणाऱ्या तीन आरोपींना युनिट २ कडुन गुन्हा दाखल.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

शासकीय रेशनिंग तांदळाच्या गोण्यांची आदलाबदली करणाऱ्या गुन्हा दाखल.

रेशनिंग तांदुळाचा अवैधरित्या काळाबाजार करून ९,६५,०००/- रुपयाचा मुद्देमाल सह तीन आरोपींना युनिट २ कडुन जेरबंद.

दि ०१/०७/२०२२ रोजी युनिट-२, कडील अधिकारी व पोलीस अंमलदार कर्तव्यावर हजर असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने यांना वरिष्ठांच्या सांगण्यावरून बातमी मिळाली की, खडकमाळ, घोरपडी पेठ पुणे येथे रेशनिंग तांदुळाचा अवैध साठा असून, त्यापैकी काही रेशनिंगचा तांदूळ हा शिरवळ, सातारा येथे विक्री करिता पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पो मधून जात आहे.

अशी खबर प्राप्त होताच सदरची बातमी युनिट-२ कडील प्रभारी अधिकारी श्री. क्रांतीकुमार पाटील यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीचे अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन स्वतः पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक, राजेंद्र पाटोळे, व युनिट-२ कडील पोलीस अमलदार यांच्यासह जेधे चौक, स्वारगेट पुणे येथे सापळा लावून त्यानंतर घोरपडी पेठ पुणे येथील गोडाऊन मध्ये छापा टाकून एकूण २४० नग रेशनिंगचा तांदूळ, एक शिलाई मशीन, १५० नग रेशनिंगचे रिकामी पोती, व पिकअप टेम्पो असा एकूण ९,६५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन

इसम नामे 1) दीपक दशरथ कुदळे वय ५६ वर्ष, रा.६९२ घोरपडी पेठ, पुणे

2) संदीप तेजराव वहे वय ३९ वर्ष, रा .सर्वे नंबर ५६८ मोहम्मद वाडी, हडपसर पुणे

3) कार्तिक विकास माने वय २१ वर्ष राहणार ६९२ घोरपडी पेठ पुणे यांना आज रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२२ अत्यावश्यक वस्तू सन १९५५ चा कायदा कलम ३,७ या गुन्ह्यांमध्ये २२/२० वाजता अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ कडील अधिकारी करीत आहे .

सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गजानन टोंपे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी.वैशाली भोसले , विशाल मोहिते, पो.उप-नि. राजेंद्र पाटोळे , पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हणे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, उत्तम तारू, विजय पवार,गणेश थोरात,गजानन सोनुने, निखिल जाधव, समीर पटेल, कादिर शेख, नागनाथ राख यांनी केलेली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *