पुणे शहर पेट्रोलपंपाची रोख रक्कम लुटणारे गुन्हेगार जेरबंद

दिनांक – २३/०६/२०२१ युनिट -५ , गुन्हे शाखा , पुणे शहर पेट्रोलपंपाची रोख रक्कम लुटणारे गुन्हेगार जेरबंद लाखोंचा मुदेमाल हस्तगत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

दिनांक १४/०६/२१ रोजी वानवडी पोलीस स्टेशन हददीतील सैय्यदनगर , हडपसर येथील मगर पेट्रोलपंपाची कॅश पेट्रोलपंपावरील मॅनेजर बँकेत भरणा करण्यासाठी घेवुन जात असतांना त्यास रोडमध्ये अडवुन कोयता दाखवुन त्याचेकडील सुमारे ८,७४,००० / – रुपये असलेली बॅग अनोळखी इसमांनी लुटल्याबाबतचा गुन्हा वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता .

सदर गुन्हयाचे गंभीर स्वरुप पाहता मा.पोलीस आयुक्त साो . श्री.अमिताभ गुप्ता व पोलीस सह – आयुक्त श्री.रविंद्र शिसवे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघकीस आणण्याबाबत मा.अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोरोळे व पोलीस उपआयुक्त श्री.श्रीनिवास घाडगे ( गुन्हे ) यांना आदेशीत केले होते . त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश युनिट ५ गुन्हे शाखा यांना देण्यात आले होते . त्यानुसार सदर गुन्हयाचा तपास युनिट ५ चे पोनि हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सुरु केला होता . सदर गुन्याचा तपास करीत असतांना युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी सातत्य ठेवत सलग तिन दिवस आहोरात्र मेहनत घेवुन आरोपींचा माग काढत सुमारे १९ किलोमीटर वरील अंदाजे २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले . आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी यांनी गुन्हयात वापरलेली मो.सायकलची नंबर प्लेट काढुन ठेवली होती त्यामुळे आरोपींची माहीती मिळण्यास खुप अडचण निर्माण झाली होती , परंतु युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी हार न मानता शोध मोहीमेत सात्यत्य ठेवले होते . अखेरीस एका कॅमेरामध्ये आरोपींची छबी व आरोपींनी पुन्हा लावलेली नंबर प्लेट यावरुन आरोपींचा सुगावा युनिट ५ यांना लागला . त्यादरम्यान तांत्रीक विश्लेषणावरुनही आरोपींची माहीती मिळविण्यात यश प्राप्त झाले होते . त्यामुळे सदर गुन्हयातील आरोपींची ओळख पटवुन माहीती काढुन आरोपी नामे १ ) उबेद अन्सार खान वय २० रा.सैय्यदनगर , हडपसर २ ) अरबाज नवाब पठाण वय- १९ रा . हांडेवाडीरोड हडपसर ३ ) तालीम आसमोहमद खान वय- २० रा.सय्यदनगर , हडपसर ४ ) अजीम उर्फ आंटया महंमद हुसेन शेख वय -२२ रा.सय्यदनगर , हडपसर ५ ) प्रजोत कानिफनाथ झांबरे ( पेट्रोल पपांवरील कर्मचारी ) , वय -२० रा.चिंतामणीनगर मगर पंपाजवळ , हडपसर अशा एकुण पाच आरोपींना बेडया ठोकण्यात युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांना यश आले असुन आणखी एका आरोपीचा शोध युनिट ५ घेत आहे . सदर आरोपीतांकडे सखोल चौकशी केली असता सर्व घटनाक्रम समोर आला . यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन मौजमजा करण्यासाठी पैसे नसल्याने आरोपी यांनी कट रचुन सैय्यदनगर मधील मगर पेट्रोलपंपावर लक्ष केंद्रीत केले व पेट्रोलपंपाची रक्कम किती जमा होते व कधी बँकेत जमा करण्यास कोण जाते याची सर्व माहीती आरोपीतांनी मिळविण्यास सुरवात केली . या कटामध्ये आरोपीतांनी पेट्रोलपंपावर काम करणा – या एका कर्मचा – यास सहभागी करुन घेतले होते . यामधील आरोपी प्रजोत झांबरे हा पेट्रोपंपावर कामास होता व त्याने सदरची माहीती ही आरोपी उबेद खान यास दिली . त्यानंतर यातील आरोपी अरबाज खान व तालीम खान यांनी एका मो.सा वरुन पैसे घेवुन जाणा – या कर्मचा – याचा पाठलाग केला व उर्वरीत आरोपी यांनी आजुबाजुला थांबुन लक्ष ठेवले होते त्यानुसार पेट्रोलपंपावरी कर्मचा – याचा पाठलाग करुन शस्त्राचा धाक दाखवुन रोख रक्कम पळवुन नेली होती . सदर आरोपी यांना युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेवुन सदरचा दरोडा उघडकीस आणलेला आहे .

यातील आरोपी उबेद अन्सार खान वय -२० रा.सय्यदनगर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता समर्थ पोस्टे हददीत घरफोडी केल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे . सदरचा आरोपी हा खालील गुन्हयात फरार होता .

१ ) येरवडा पोस्टे गुरनं ३०८/२१ भादवि ५०६ ( २ ) , क्रिमीनल अमेंडमेंट कमल ७

२ ) समर्थ पोस्टे गुरंन ३ ९ / २१ भादवि क ४५७ , ३८० ( उघडकीस आलेला गुन्हा )

३ )राजारामपुरी पोस्टे गुरनं २०६/२० भादवि ३७६ , पोस्को कलम ४,६,८,१२

४ ) राजारामपुरी पोस्टे गुरनं २१२/२० भादवि १८८ , संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा १८ ९ ७ , कोविड कायदा कमल २०१९

प्रमाणे सरदच्या आरोपीतांकडुन एकुन रोख रक्कम ५,७९ , ००० / -रुपये , २,६०,००० / -रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने , किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आलेला असुन पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहे .

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता साो , पुणे शहर , मा.पोलीस सह – आयुक्त श्री.रविंद्र शिसवे , पुणे शहर यांचे मार्गदर्शनानुसार मा.अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री.अशोक मोराळे साो . मा.पोलीस उप – आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे साो , मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.लक्ष्मण बोराटे सो . ( गुन्हे २ ) यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -५ चे वपोनि हेमंत पाटील यांचे सुचनेनुसार सपोनि संतोष तासगावकर , सपोनि प्रसाद लोणारे , पोहवा महेश वाघमारे , पोहवा अश्रुबा मोराळे , पोहवा अजय गायकवाड , पोहवा रमेश साबळे , पोहवा प्रविण काळभोर , पोहवा दिपक लांडगे , पोहवा दत्ता ठोंबरे , पोना चेतन चव्हाण , पोना विशाल भिलारे , पोना विनोद शिवले , पोना दाउद सैय्यद , पोना प्रमोद टिळेकर , पोना अमरचंद्र उगले , पोशि विलास खंदारे , पोना पोशि संजय दळवी , मपोना स्वाती गावडे , पोशि स्नेहल जाधव या पथकाने केली आहे .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *