Pune Traffic Police वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

Pune Traffic Police तर ‘ त्या ‘ वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार ‘ ! पोलिस आयुक्त , सह आयुक्तांकडून ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांवर होणाऱ्या कारवाईच्या ‘ स्पीड’ला ‘ ब्रेक ‘ सह ‘ जॅमर ‘ सर्व टोईंग , पावत्या करण्यास बंद करण्याचा आदेश ; प्राप्त तक्रारीची विशेष शाखेच्या डीसीपींकडे चौकशी ताज्या बातम्या पुणे पोलीस घडामोडी .

On Jun 12 , 2022 Pune Traffic Police

वाहतूक पोलिसांच्या पोलिसांच्या कारभाराच्या तक्रारी वाढल्याने

स्वत : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांना आता हस्तक्षेप करण्याची पाळी आली . त्यांच्या आदेशाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या टोईंगच्या कारवाया थांबविण्यात आल्या आहेत . तसेच रस्त्यावर उभे राहून कोणत्याही पावत्या करण्यात येणार नाहीत , वाहतूक पोलीस फक्त वाहतूकीचे नियमन करण्याकडे लक्ष देतील , असे आदेश काढण्यात आले आहेत . त्याचबरोबर वाहतूक पोलिसांविषयी आलेल्या तक्रारीची चौकशी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे सोपविण्यात आली असून त्यात जे दोषी आढळून येतील , त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे .

वाहतूक पोलीस चौकात उभे राहण्याऐवजी रस्त्याच्या एका बाजूला उभे राहून डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर मनमानीपणे दंडाची आकारणी करतात , त्यांच्या वाहनांची चावी काढून घेतात , त्यांना आरेरावी करतात . अशा तक्रारी येत होत्या . वाहन उचलून नेणाऱ्या टोईंग वाहनावरील तरुण मनमानीपणे वाहने उचलतात .अगोदर वाटेल तेवढा दंड सांगतात . त्यानंतर तोडपाणी करतात , अशा असंख्य तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या . वाहतूक पोलिसांच्या या अरेरावीचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही अनुभव आला . त्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांपर्यंत गेल्या . त्यानंतर पोलीस सह आयुक्त यांनी सर्व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिला .

त्यात रस्त्यावरील कोणतेही वाहन पुढील आदेशापर्यंत टोईंग वाहनाद्वारे उचलले जाणार नाही . रस्त्यावर ज्या केसेस केल्या जातात . त्या पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही पावती केली जाणार नाही . – जर वाहतूकीला अडथळा येत असेल , वाहनचालकाने रस्त्यामध्येच गाडी लावली असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते आपल्या पोलीस उपायुक्तांना पाठवून त्यांच्या परवानगीने असे वाहन टोईंग करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा .

वाहतूक पोलिसांना टिका होत असल्याने त्याची खात्री करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना पाठविण्यात येणार आहे . अशा वेळी काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे . वाहतूक शाखेविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे . त्यांच्या प्राथमिक चौकशीत जे आढळून येईल , त्यानुसार टोईंग चालक , मालक किंवा वाहतूक पोलीस यांच्यापैकी कोणावर खंडणीचा गुन्हा दाखल करायचा हे निश्चित करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे .

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस निरीक्षक , सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांची बैठक घेऊन संपूर्ण शाखेची झाडाझडती घेतली

नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये . या तक्रारीत तथ्य आढळून आल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सर्वांना दिला .

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *