विक्री करण्यासाठी आला होता ,पोलीसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेडया.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ०१/०३/२०२२ – खडक पोलीस स्टेशन पुणे शहर
विक्री करण्यासाठी आला होता , पोलीसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेडया
आठ धारदार कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत.
सदर बाबत अधिक माहिती अशी की , दिनांक २८/०२/२०२२ रात्री २१/०० वा ते दिनांक ०१/०३/२०२२ रोजी रात्री ०१/०० वा . पर्यत ऑल आऊट ऑपरेशन राबविणे बाबत मा .पोलीस उप आयुक्त साो गुन्हे पुणे शहर यांचा आदेश प्राप्त झाला होता . त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या , त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस अंमलदार संदीप तळेकर व हिंमत होळकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , समर्थ पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार
सोहेल यासीन शेख (वय-२७, रा.भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोहेल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्येही २०१७ मध्ये खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल आहे.
त्याचेकडील पिशवीची झडती घेतला त्यामध्ये एकुण २,८०० / -रुकिंचे ०८ धारदार कोयते मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप तळेकर व हिंमत होळकर यांना समर्थ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सोहेल शेख हा भवानी पेठेतील दादा पीर दर्ग्यासमोर थांबलेला असून त्याच्याकडील पांढऱ्या पिशवीमध्ये कोयते असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या आदेशाने आरोपी सोहेल शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये २,८००/- रुपये किमतीचे ८ धारदार कोयते पोलिसांना सापडले. कोयत्यांबाबत त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने ते कोयते विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर करीत आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास अतुल बनकर पोलीस उप निरीक्षक , खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत .
वरील कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, परिमंडळ-१ च्या पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे फरासखाना विभागाचे सहा.पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हेचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, राहुल खंडाळे, अतुल बनकर, पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार, अजीज बेग, संदीप पाटील, रवी लोखंडे, सागर घाडगे, राहुल मोरे, विशाल जाधव, हिंमत होळकर, कल्याण बोराडे, रफिक नदाफ, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, किरण शितोळे, महेश पवार, दिनेश खरात यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad