सायबर पोलीसांनी पोक्सो गुन्हयातील आरोपीस दिल्ली येथुन केले जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ०७/०७/२०२१ सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर सायबर पोलीसांनी पोक्सो गुन्हयातील आरोपीस दिल्ली येथुन केले जेरबंद

फ्री फायर , व्हॉट्सअॅप , स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम यांसारख्या ऑनलाईन मोबाईल गेम , ॲप व सोशल नेटवर्कीग वेबसाईट चा वापर करुन पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करुन , चॅटींगद्वारे तीचेशी संपर्क वाढवुन तीला धमकी देवुन तीचे प्रायव्हेट पर्सनल फोटो प्राप्त करुन सदरचे फोटो बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरुन प्रसारीत करुन तीची बदनामी केलेबाबत अल्पवयीन मुलीचे वडीलांनी सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे तक्रार दिली होती सदरबाबत सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर , गु.रजि.नं. १५/२०२१ भादवि कलम ३५४ ( डी ) , ५०६ , ३४ सह पोक्सो अॅक्ट कलम ११ ( ५ ) , १२ सह आयटी अॅक्ट ६६ ( ई ) ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

नमूद गुन्हयाचे तपासामध्ये , आरोपीने गुन्हयात वापरलेले बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले . त्यामध्ये नमुद गुन्हयातील आरोपी हा सध्या दिल्ली येथील असल्याची माहिती प्राप्त झाली .

ONLINE PORTAL NEWS

गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन लागलीच मा . वरिष्ठांचे परवानगीने दिल्ली येथे सायबर पोलीस स्टेशनकडील तपास पथक पाठविण्यात आले . सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता , सदरचा गुन्हा निरज कुमार रामशाबाद , वय २८ वर्षे , व्यवसाय नोकरी , रा . ३४ सी डीडीए फ्लॅट मयुर विहार , फेज १ , न्यु दिल्ली याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्हयात दिल्ली येथे दि . ०५/०७/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

नमूद आरोपीची दिल्ली येथून ट्रान्झिट रिमांड मंजूर करुन घेवून त्यास मा . विशेष न्यायाधीश , पोक्सो कोर्ट , सत्र न्यायालय , शिवाजीनगर पुणे यांचे समक्ष आज रोजी हजर केले असता , मा . न्यायालयाने आरोपीस दि . १२/०७/२०२१ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे .

सदरची कारवाई पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . अशोक मोराळे , पोलीस उपआयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे भाग्यश्री नवटके , सहाय्यक पोलीस आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे श्री.मिलींद पाटील ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि.डी.एस.हाके , पो.नि.अंकुश चिंतामण , तपासी अधिकारी पो.नि. संगिता माळी , सपोनि शिरीष भालेराव , सपोनि . कदिर देशमुख , पोहवा राजेश केदारी , अस्लम आत्तार , पोना मंगेश नेवसे , पोशि योगेश वाव्हळ , नितेश शेलार , प्रविणसिंग राजपूत , शिरीष गावडे , अमोल कदम , गिरमल्लेश चलवादी , रविंद्र साळवे , मपोशि अंकिता राघो , माधुरी डोके या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली .

अशा प्रकारे ऑनलाईन पध्दतीने फ्री फायर , व्हॉट्सअॅप , स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम या माध्यमातुन अल्पवयीन मुला – मुलींशी ओळख करुन त्यांचेशी मैत्री वाढवुन गुन्हे करणारे गुन्हेगारांपासुन सावध राहण्याबाबत तसेच वैयक्तीक फोटो कोणत्याही अज्ञात इसमास शेअर न करणेबाबत सायबर पोलीस स्टेशन , शिवाजीनगर , पुणे यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *