Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, हडपसर तपास पथक पोलिसांची कामगिरी २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त .


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, हडपसर तपास पथक पोलिसांची कामगिरी २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त .

पुणे,दि.०९:-(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

पेट्रोल डिझेल चोरी प्रकरणी हडपसर पोलिसांच्या कारवाईत हवाई इंधनाचे ८ टँकर सह सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ,४ आरोपी अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

लोणी काळभोर परिसरातील पेट्रोल कंपन्यांमधून पेट्रोल घेऊन ते काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा करुन ठेवलेले चार टँकर पुणे शहर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २ कोटी २८ लाख ५ हजार ९९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल / डिझेल चोरीचे अनुषंगाने वपोनि अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांनी तपास पथक तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी यांना हजेरीवर सूचना दिलेल्या होत्या.

त्याचे अनुषंगाने हडपसर तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अमलदार अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके, रशिद शेख असे दि. ०८/०४/२०२३ रोजी पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,लोणी काळभोर येथील एच पी ट्रमिनलमधून पेट्रोल, डिझेल घेऊन टँकर बाहेर पडतात. त्यानंतर वाटेत थांबून त्यातील काही लिटर पेट्रोल, डिझेल चोरून त्याचा काळा बाजारात विक्री करतात हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे चार टँकर थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व छापा दि.८ रोजी सकाळी ०६/३० वा चे सुमारास छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टैंकर मधील बॉल बॉक्स मधुन इंधन काढताना व सदर ठिकाणी इंधनाने भरलेले १४ प्लॅस्टीकचे कॅन मिळुन आले. पुढील कारवाई करणेकामी सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समक्ष बोलावून घेतले.


सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर – ५५४/२०२३ भा.द.वि. कलम- ३७९,२८५,३४ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून,, सदरील अवैध रित्या पेट्रोल ची चोरी करणारे इसमांची नावे

१) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिराजवळ, हडपसर पुणे. मुळ राहणार काछा पूरेबोधराम का पुरवा, पोस्ट दूल्हेपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश

२) दाजीराम लक्ष्मण काळेल वय ३७ वर्ष, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. वळई ता. माण, जि. सातारा

३) सचिन रामदास तांबे वय ४० वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वाकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. व

४) शास्त्री कवलु सरोज वय ४८ वर्षे, धंदा मजुरी, राहणार- सध्या १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वाकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. हे इसम नामे

५) सुनिल रामदास तांबे वय अंदाजे ३८ वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे.

यांचे सांगणेवरुन आम्ही टँकरमधून पेट्रोल चोरी करीत असल्याचे सांगितले. हडपसर पोलीसांनी सदर ठिकाणाहून पेट्रोल/डिझेल चोरी करण्याचे साहित्य ०८ पेट्रोलचे टँकर, १४ पेट्रोल कॅण्ड, इलेक्ट्रिक मोटारपंप वगैरे एकुण किंमत रुपये २,२८,०५, ९९५/- “ (दोन कोटी अठ्ठाविस लाख पाच हजार नउशे पंचांनो रु) चा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा सगो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक: हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे पोनि (गुन्हे) विश्वास डगळे पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, रशिद शेख, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंचरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, कुंडलीक केसकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *