खडक पोलीस स्टेशनची कामगिरी. आरोपीकडुन एकुण २,०५,००० /मुद्देमाल जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

. खडक पोलीस स्टेशनची कामगिरी.

सराईत गुन्हेगार अटक करुन त्याचेकडुन रिक्षा , केटीएम , अॅक्टीव्हा असे एकुण २,०५,००० / -रुकिं चे वाहने जप्त करण्यात खडक पोलीसांना यश

सदर बाबत अधिक माहिती अशी की , खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री .श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या , त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस अंमलदार रवी लोखंडे व संदिप तळेकर यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की , रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे विनायक कोळी रा . लोहीयानगर पुणे याने सुमारे दोन ते अडीच महिन्यापूर्वी बिकानेर स्वीट शेजारी छ . शिवाजी महाराज रोड पुणे येथून रिक्षा चोरली असुन तो साठे उदयान शुक्रवार पेठ पुणे येथे थांबलेला आहे , अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या माहितीचे आधारे मा.श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपी विनायक भारत कोळी वय २६ वर्षे सध्या रा .कोळी गॅस जवळ , देहुरोड शिवाजी विद्यालय समोर पुणे मुळ रा .५४ बी पी घर नं ३० , लोहीयानगर , राम मंदिराचे पाठीमागे पुणे यास पकडुन त्याचेकडे वाहन चोरीचे अनुषागाने अधिक तपास करता त्याचेकडुन १ रिक्षा , १ केटीएम बाईक , १ अॅक्टीव्हा गाड्या अशा एकुण ०३ चाहने जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त केलेली रिक्षा बाबत खडक पोलीस ठाणेस , केटीएम बाईक बाबत रबाळे पोलीस ठाणेस नवी मुंबई व अॅक्टीव्हा मोपेड बाबत पिंपरी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल असल्याचे तपास दरम्यान निष्पन्न झाले असुन आरोपीकडुन एकुण २,०५,००० / – ( दोन लाख पाच हजार रुपये ) चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

आरोपी विनायक भारत कोळी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचा पुर्व इतिहास पाहता त्याचेवर यापुर्वी खडक , देहुरोड पोलीस ठाणेस जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

नमुद सर्व कारवाई ही श्री.अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त ,श्री.राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , श्री . विवेक पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री . श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्री . राहुल खंडाळे , शंकर कुंभारे पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग , संदिप पाटील , संदिप तळेकर , रवी लोखंडे , विशाल जाधव , राहुल मोरे , हिंमत होळकर , सागर घाडगे , नितीन जाधव , प्रवीण गव्हाणे , किरण शितोळे , महेंद्र पवार यांचे पथकाने केली आहे .

खडक पोलीस स्टेशन , पुणे शहर ( श्रीहरी बहिरट ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *