हडपसर परिसरात अल्पवयीन मुलाचा खुन करणारे सराईत गुन्हेगारांना २ तासात अटक,हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी..apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
अल्पवयीन मुलाचा खुन करणारे सराईत गुन्हेगारांना २ तासात अटक, हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी..,हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर
दिनांक -१८/०९/२०२३.(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
पुण्यात एक धक्कादायक अशी घटना हडपसर परिसरात समोर आलेली असून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलावर लोखंडी धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आलेला आहे. सहा ते सात जणांनी मिळून हा प्रकार केलेला असून सदर घटनेत १७ वर्षीय मुलाचा अखेर मृत्यू झालेला आहे.
तसेच आरोपी यांनी त्यांच्या कडील लोखंडी धारदार हत्यारे हवेत फिरवुन परीसरात दहशत पसरवली. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं १४०६ / २०२३ भादंवि कलम ३०२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला..तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार यांनी माहीती घेतली असता,
उपलब्ध माहितीनुसार , स्वप्निल झुंबर्डे असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी सनी रावसाहेब कांबळे , अमन साजिद शेख , आकाश हनुमंत कांबळे , जय शंकर येरवळे, तोफिक रजाक शेख ,शाहरुख साजिद शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.स्वप्निल झुंबर्डे याला हडपसर परिसरात आरोपी भेटले आणि मागील भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर त्यांनी हल्ला केला त्यामध्ये स्वप्निल याचा जागीच मृत्यू झालेला असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनी त्यानंतर लोखंडी हत्यार हवेत फिरवत ‘ आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर त्यांचा असाच मुडदा पाडू ‘ असे ओरडत परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख यांचे मागदर्शना खाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. रविंद्र शेळके, पोनि (गुन्हे) श्री. संदीप शिवले, श्री. विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, कुंडलीक केसकर, रशिद शेख, प्रशांत टोणपे, अनिरूध्द सोनवणे यांचे पथकाने केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad