पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी ताज्या बातम्या पुणे

On Jul 1 , 2022

पुणे : पावसाने ओढ दिल्याने मुंबई पाठोपाठ आता पुणेकरांवर ही पाणी कपातीचं संकट आलं आहे . याचे मुख्य कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरणातील जलसाठा कमी झाला आहे . या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे .

सोमवारपासून ( दि .4 ) शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे . त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे . खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवले होते . पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही . चार धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे .

त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे . यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याची तीन दिवसांपूर्वी बैठक होणार होती , पण ही बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला होता . पुण्यात अगोदरच असमान पाणी पुरवठा होत असून काही भागात दिवसभर पाणी असते तर काही भागात दिवसातून एक वेळच पाणी मिळत आहे . त्यामुळे पाणी कपात झाली तर कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन पुणेकरांना पाणीच मिळणार नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचे यापूर्वीच्या पाणी कपातीमधून स्पष्ट झाले आहे .

त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणी केली जाते . यंदाही पाणी कपात करण्याच निर्णय झाल्यावर त्याची अंमलबजावणी कशी करायची याची तयारी प्रशासन नियोजन करत आहे .

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी ( दि .३०) पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली . या बैठकीत कशा पद्धतीने नियोजन केले आहे याचा आढावा घेतला . पुण्यातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा पाहता पाणी कपात करताना एक दिवसाआड पाणी देणेच शक्य आहे . त्यामुळे त्याचे वेळापत्रक जाहीर करुन सोमवारपासून अंमलबजावणी करावी अशी चर्चा बैठकीत झाली . महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की , धरणातील पाणी साठा कमी झाला आहे . त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे . सोमवार पासून पुण्यामध्ये पाणी कपात लागू होईल . त्याचे वेळापत्रक व इतर निर्णय शुक्रवारी ( दि १ ) अंतिम केला जाईल . पाऊस लांबणीवर पडल्याने महापालिकेला हा निर्णय घ्यावा लगत असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले .

पुण्यात ३० टक्के पाणी कपात पुणे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असला तरी एकूण पाणी वापरता साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात केली जाईल . सध्या रोजचा पाण्याचा वापर १६५० एमएलडी एवढा आहे . त्यात 30 टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज १२०० एमएलडी पाणी वापर करावा लागणार आहे . रोजचा ४५० एमएलडी वापर कमी होणार असल्याने काही भागात पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *